Ad will apear here
Next
नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा


पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा २५०० फूट जागेत साकारण्यात आला होता. दिव्य स्वरूपात उभारलेल्या या देखाव्यातून भाविकांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाते आणि त्यांच्या १६० कलाकार कामगारांनी अवघ्या १८ दिवसांत दिवसरात्र मेहनत करून तयार केला. या देखाव्याचे उद्घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते झाले.

शिर्डी येथील साईबाबा यांचे समाधी मंदिराची प्रतिकृती ७३ फूट उंच, ७२ फूट लांब व २६ फूट रुंद आकारात इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सात फूट उंचीची श्री साईबाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीप्रमाणेच घडविण्यात आली आहे. मूळ मंदिराशेजारीच महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई देवीच्या मंदिराची २२ फूट लांब, १० फूट रुंद व १८ फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

समाधी मंदिराच्या डाव्या हातास द्वारकामाईंच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या मंदिरातच खास शिर्डीहून आणलेल्या धुनीचा वापर केला जात आहे; तसेच साईबाबांचे दर्शन ज्या कमानीतून होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे, तशीच कमान येथे तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिरातील वातावरण प्रसन्न वाटावे म्हणून सतत प्रार्थनेचा जयघोष केला जात आहे.

या देखाव्याबाबत बोलताना आमदार भोसले म्हणाले, ‘नरवीर तानाजी तरुण मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे; तसेच साईबाबा यांच्या समाधी दिनाचे हे शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून आम्ही मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साईबाबा यांच्या शिर्डी येथील मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला. अनेक भाविकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी येथे दर्शनास जाणे अशक्य असते, या सर्वांची इच्छा लक्षत घेऊनच आम्ही हा देखावा सादर केला आहे.’  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZOOBS
Similar Posts
शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, यांच्या वतीने २६ जुलैपासून सुरू असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता हभप चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या कीर्तनाने झाली.
नरवीर तानाजी वाडी येथे सामूहिक अथर्वशीर्ष पठण पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगळवारी (१८ सप्टेंबर) महिलांचे सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. ‘ओम नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि’ या पवित्र मंत्रोच्चारात २०० हून अधिक महिलांनी सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण करून गणरायाची आराधना केली
आमदार भोसले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पुणे : आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या दळवी रुग्णालयात गरोदर महिला व नवजात बालकांच्या नावाने विमा पॉलिसी नोंदणी व वितरण करण्यात आले. नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळ, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, नरवीर ग्रुप, कट्टा ग्रुप, श्रीकृष्ण मित्र मंडळ, गोळी ग्रुप व खैरेवाडी
वारजे येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे’ उपक्रम ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील एक अनोखा उपक्रम पाच आणि सहा ऑगस्ट रोजी वारजे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जायचे आहे आणि त्या बदल्यात आपल्याकडील एक पुस्तक द्यायचे आहे. नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान व वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीने संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language